नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील स्थगिती ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंत केवळ विशेष उड्डाणांचे संचालन सुरू राहील.
देशातील उड्डाण सुरक्षा नियामक (डीजीसीएने) गुरुवारी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. डीजीसीएच्या माहितीनुसार, ही बंदी आंतरराष्ट्रीय मालवाहू संचालन आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाकडन मंजुरी घेतलेल्या उड्डाणांना लागू नसेल. भारतातून उड्डाण घेणाºया किंवा भारतात दाखल होणारी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणांनाच हे निर्बंध लागू होतात. काही ठराविक मार्गांवर आंतरराष्ट्रीय विशेष उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन भारताने २३ मार्च २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली होती. त्यानंतर वंदे भारत मिशन अंतर्गत सरकारकडून मंजुरी देण्यात आलेल्या काही मार्गांवर परदेशी उड्डाणं सुरू आहेत.
बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक