29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय दिल्ली आणि परिसरात इंटरनेट बंदी

दिल्ली आणि परिसरात इंटरनेट बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय कृषि कायद्याला विरोध म्हणून शेतक-यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी उसळलेल्या हिंंसाचारानंतर दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील इंटरनेट सेवा बंद करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आले. मात्र, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचा सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिल्लीत टॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर लगेचच मोबाइल इंटरनेट बंदीचे निर्देश देण्यात आले. कोरोना संकटामुळे घरून काम करणा-या कर्मचा-यांना तसेच, ऑनलाईन क्लास असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या अनेकविध प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन क्लास रद्द
पश्चिम दिल्ली भागातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंद असल्यामुळे ऑनलाईन क्लास रद्द करण्यात आले. केवळ घरून काम करणारे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाच इंटरनेट बंदीचा फटका बसला असे नाही, तर यामुळे सामान्य कामकाजही विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे, तर इंटरनेट बंदीमुळे ऑनलाईन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाल्याचे समोर येत आहे.

जनजीवन विस्कळीत
इंटरनेट बंदीचा सुमारे पाच कोटी नागरिकांवर थेट प्रभाव पडल्याची माहिती मिळाली आहे. राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक ठिकाणचे सामान्य जनजीवनही विस्कळीत झाले आहे. यामुळे दिल्लीत गेलेल्या प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे.

सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या