27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी हस्तक्षेप

कोरोनाबाधितांची संख्या कमी दाखवण्यासाठी हस्तक्षेप

थायरोकेअरच्या एमडींचा आरोप ; सरकारी अधिका-यांकडून प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे खासगी कोरोना चाचणी केंद्र थायरोकेअरने कोरोना चाचण्यांसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए.वेलुमणी यांनी केला. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी कोरोना विषाणूची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलूमणी यांनी केला.

‘‘सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होते आहे. आम्हाला निरनिराळ्या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमूने न घेण्यास सांगितले जात आहे आणि आम्ही बनावट पॉझिटिव्ह अहवाल सादर करत असल्याचा दावा केला जात आहे,’असे वेलूमणी यांनी म्हटले आहे.‘दररोज कमीतकमी १०० जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमूने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या कमी आहे हे दाखवणे हा यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतिमा चांगली ठेवू इच्छित आहेत.

थायरोकेअरने ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी ३० टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांचे नाव घेतले नाही. परंतु आपल्या कर्मचा-यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचे त्यांनी सांगितले.थायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांच्या चाचण्यांचे नमूने एकत्र करण्याचे काम थायरोकेअरद्वारे करण्यात येते.

अधिकाधिक चाचण्या आवश्यक
दरम्यान, दुसरीकडे मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. ‘जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकेच कोरोनाबाधितांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही आपल्याला मिळेल. याद्वारे आॅक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो,’

‘वेलुमणी यांनी उचललेल्या मुद्द्यांचा आम्हीदेखील सामना करत आहोत. महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागांमध्ये असे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होताना दिसत नाहीत. परंतु काही ठराविक ठिकाणी हे होताना दिसत आहेत. अशा प्रकारांमुळे आम्हाला पूर्ण क्षमतेने चाचण्या करता येत नाहीत.’ असे एका चाचणी केंद्राच्या अधिकाºयाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

सौदीने भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर वगळले ; भारताकडून संताप व्यक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या