26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयइक्बाल मिर्चीची २०० कोटींची संपत्ती जप्त; दुबईतील मालमत्तेवर ईडीची टाच

इक्बाल मिर्चीची २०० कोटींची संपत्ती जप्त; दुबईतील मालमत्तेवर ईडीची टाच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हेगारी जगताला दणका दिला आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीच्या दुबईतील २०० कोटींच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली. आतापर्यंत मिर्चीच्या ८०० कोटींच्या मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

६०० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती
मुंबईच्या वरळीमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सीजे हाऊस, साहिल बंगला, राबिया मेंशन, मरियम लॉज व सी व्यू यांच्या बेकायदा खरेदी-विक्री प्रकरणी मिर्ची, त्याचा परिवार व इतर काही जणांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. या प्रकरणात गेल्यावर्षीही डिसेंबर महिन्यात मिर्ची व त्याच्याशी संबंधितांची ६०० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती.

वरळीतील सीजे हाऊस व ताडदेवमधील अरुण चेंबर्स या मालमत्तांचा जप्त केलेल्यांमध्ये समावेश होता. या दोन्ही मालमत्तांची किंमत ७६ कोटी रुपये इतकी आहे. तसेच साहिल बंगला, राबिया मेंशन, मरियम लॉज, सी व्यू और क्रॉफर्ड मार्केटमधील तीन दुकाने व लोणावळ्यातील ५ एकर जमीनही जप्त केली होती. संबंधित मनीलॉंड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांचीही चौकशी केली होती.

आणखी ३० मालमत्तावरही ईडीची नजर
मिर्ची व त्याच्या परिवाराच्या एकुण १५ संपत्तींवर टाच आणली आहे. याशिवाय मिर्चीच्या लंडन, दुबई व मुंबईतील आणखी ३० मालमत्ता ईडीच्या रडारवर असून त्यांचे मुल्य १ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचेही अधिका-यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या