नवी दिल्ली : नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबरावर टिप्पणी केल्याप्रकणी आखाती देशांनी भारताला धारेवर धरले होते. त्याचबरोबर जगभरातील अनेक इस्लामी राष्ट्रांनी याबाबत भारतावर टीका केली होती. त्यानंतर भारताने टीका करणा-या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिर अब्दुल्लाहीन यांनी भारताच्या भूमिकेवर समाधानी असल्याचे म्हटले.
पैगंबरावर टीका केल्याप्रकरणी भारताने जी भूमिका घेतली आहे. त्यावर इराण समाधानी आहे असं भारत भेटीवर आलेले इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिर अब्दुल्लाहीन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले की, भारत आणि भारताचे प्रशासन मोहम्मद पैगंबराचा आदर करतात, पण ज्यांनी पैगंबराबाबत अपशब्द वापरले आहेत त्यांना आम्ही पदावरून काढले आहे, असे डोवाल म्हणाले. त्यानंतर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या या भूमिकेवर समाधानी असल्याचे सांगितले.