अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माण कार्य सुरू झाले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने याबाबतची माहिती दिली आहे. हे मंदीर प्राचीन निर्माण पद्धती वापरून उभे करण्यात येत आहे. सहस्त्र वर्षांनंतरही या मंदिराला कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भूकंप, वादळ किंवा कोणत्याही संकटात मंदिराला बाधा पोहोचू नये यासाठी त्याच्या मजबुतीवर विशेष लक्ष दिले जात आहे. विशेष बाब ही आहे की या मंदिरासाठी लोखंडाचा वापर केला जाणार नाहीये.
श्री रामजन्मभूमि मन्दिर का निर्माण भारत की प्राचीन निर्माण पद्धति से किया जा रहा है ताकि वह सहस्त्रों वर्षों तक न केवल खड़ा रहे, अपितु भूकम्प, झंझावात अथवा अन्य किसी प्रकार की आपदा में भी उसे किसी प्रकार की क्षति न हो। मन्दिर के निर्माण में लोहे का प्रयोग नही किया जाएगा।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) August 20, 2020
मंदिराच्या निर्माण कार्यात दगडांना सांधण्यासाठी पितळ्याच्या पट्ट्यांचा वापर करण्यात येणार आहे. 18 इंच लांब, 3 मिलिमीटर जाडीच्या, 30 मिलिमीटर रुंदीच्या पितळी पट्ट्यांचा वापर करण्यात येणार आहे. या पितळेच्या पट्ट्या निर्माण कार्यासाठी दान करण्यात याव्यात असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. या पितळी पट्ट्यांवर दानकर्ते त्यांचे नाव कोरू शकतात असेही सांगण्यात आले आहे. या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी CBRI संस्था, आयआयटी मद्रास आणि L&T कंपनीचे अभियंते यांनी मृदा परीक्षणाला सुरुवात केली आहे. मंदिर निर्माणाच्या कार्याला 36-४० महिने लागतील असे ट्रस्टने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करावे -उदय सामंत