32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीय१४ वर्षांच्या मुलीचा गर्भपात सुरक्षित आहे का?

१४ वर्षांच्या मुलीचा गर्भपात सुरक्षित आहे का?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीच्या २६ आठवड्यांचा गर्भ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी मंगळवारी पार पडली. यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने हरयाणाच्या करनाल सिव्हिल रुग्णालयाला मेडिकल बोर्ड गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचा २६ आठवड्यांचा गर्भपात कितपत सुरक्षित राहील? याबद्दल अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून बोर्डाला देण्यात आले आहेत.

या प्रकरणात पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठात सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए़ एस़ बोपन्ना आणि व्ही़ रामसुब्रमण्यम यांचा समावेश आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर वडिलांच्या चुलत भावाकडून बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले.

बलात्कारानंतर मुलगी गर्भवती राहिली. हा गर्भ पाडण्यासाठी मुलीकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही मुलगी इयत्ता आठवीत शिकत आहे. अ‍ॅड. व्ही के बिजू यांनी पीडित मुलीची बाजू न्यायालयासमोर मांडली. मुलीचा गर्भ आताच २६ आठवड्यांचा असल्याने या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय देण्याची विनंती बिजू यांनी न्यायालयाकडे केली आहे़

लोकसभा-राज्यसभा टीव्हीचे विलीनीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या