28.9 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात. सरदारांना खलिस्तानी म्हणतात, सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख शहरी नक्षलवादी म्हणून करतात, तर विद्यार्थी संघटनांना तुकडे तुकडे गँग म्हणतात, राष्ट्राच्या विरोधातील संबोधतात.

मग असे असेल तर मला समजत नाही प्रत्येक जण दहशतवादी देशविरोधी आहे तर या देशात हिंदुस्तानी कोण आहे? केवळ भाजपाचे कार्यकर्ते?, असे म्हणत मुफ्ती यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. मला ताब्यात घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडून आलेल्या वक्तव्यामुळे मी दु:खी आहे. ज्या दिवशी आम्ही डीडीसीच्या निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तेव्हापासून प्रशासनाकडून त्रास वाढला आहे. इतकेच काय तर आपल्या उमेदवारांनाही त्रास दिला जात असल्याचे त्या म्हणाल्या.

३५ कोरोना पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या