नाशिक : पाकिस्तानच्या आयएसआयला माहिती पुरवणा-याला नाशिकमध्ये अटक करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली.पथकाला या व्यक्ती बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या विमाने तयार करणा-या कंपनीविषयीची संवेदनशील माहिती हा माणूस माहिती पुरवत होता. हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीत तो कामाला होता. आय. एस. आय. या गुप्तहेर संघटनेला भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानांच्या संवेदनशील तांत्रिक तपशीलाची, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमान कारखान्याची तसेच कारखाना परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पुरवत होता.
अटकेनंतर त्याच्याकडून तीन मोबाइल्स, ५ सीमकार्ड आणि दोन मेमरी कार्ड जप्त केली आहेत. हे सगळे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले आहे. संशयित कर्मचारी गुणवत्ता- नियंत्रण विभागात होता. काही महिन्यांपूर्वी त्याची प्रक्रिया विभागात बदली केली होती. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात त्याने आंदोलन केले होते.
आरोपीला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक देवेन भारती, महाराष्ट्र राज्य व पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह, पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या नेतृत्त्वात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील यादव, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे, प्रतिमा जोगळेकर, पोलीस उप निरीक्षक राजाराम सानप, पोलीस हवालदार संपत जाधव, संजय भुसाळ, विलास वाघ, सुदाम सांगळे, पोलीस नाईक दीपक राऊत, प्रमोद उबाळे व पोलीस शिपाई गोविंद जाधव यांनी कारवाई पार पाडली.
भीमा कोरेगाव प्रकरण : स्टॅन स्वामी यांना अटक