22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयआयएसआय-खालिस्तानी दहशतवादी कनेक्शन

आयएसआय-खालिस्तानी दहशतवादी कनेक्शन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) सोमवारी गँग आणि गुन्हेगारी सिंडिकेटवर कारवाईसाठी देशभरात ६० ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील ठिकाणांचा समावेश आहे.

एनआयएची ही कारवाई देशभरातील गुंडांच्या अड्ड्यांवर केली जात असून मुसेवालाच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या तपासात अनेक गँगचे करक आणि खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर आले होते. त्यानंतर देशभरातील विविध गुंडांच्या ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे. यामध्ये गोल्डी ब्रारसारख्या गुंडांचा समावेश आहे. ज्याने कॅनडातून सिद्धू मूसेवाला हत्येचे सूत्रसंचालन केले होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेन्स बिश्नोई टोळी, बंबीहा गँग आणि नीरज बवाना टोळीशी संबंधित असलेल्या १० गुंडांविरुद्ध प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) दोन एफआयआर नोंदवल्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. एवढेच नव्हे तर, पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आणि दहशतवादी गट आयएसआय यांच्यात जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारसह संदीप उर्फ काला जथेडीचे दहशतवादी कनेक्शनही समोर आले आहे. त्यानंतर देशभरात ही छापेमारी केली जात आहे.

सलमानही रडारवर
मूसेवालाच्या हत्येनंतर पोलिस तपासात अटकेतील आरोपीने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान हादेखील या टोळाच्या रडावर होता. तसेच त्याच्या हत्येसाठी सलमानच्या मुंबईतील घराची रेकीदेखील करण्यात आली होती, असा खुलासा पंजाब पोलिसांनी केला आहे. कपिल पंडितने सांगितले की, तो आणि त्याचे दोन साथीदार रेकी करण्यासाठी मुंबईला गेले होते.

२३ जणांना अटक
मूसेवाला हत्येप्रकरणी आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली असून या घटनेत एकूण ३५ जणांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये चकमकीदरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या तपासात कपिल पंडितला लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानलाही लक्ष्य करण्यास सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या