20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeराष्ट्रीयभारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

मुस्लिमांना भारताविरूद्ध 'जिहाद' चा रस्ता निवडण्याचे आवाहन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे.

भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठ्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले असून, व्हॉईस ऑफ हिंद या ऑनलाईन मासिकाच्या माध्यमातून देशात धार्मिक हिंसाचार घडविण्याचे स्वप्न भंगले आहे़ यामध्ये आयएसआयएस आतंकवादी भारतातील मुस्लिम बांधवांचे ब्रेन वॉश करून त्यांना भारताविरूद्ध शस्त्रे हातात घ्यायला सांगत आहेत. मासिकात लिहिलेल्या एका लेखानुसार, मुस्लिमांना भारत सरकारविरूद्ध जिहादचा रस्ता निवडण्याचे सांगितले आहे.

बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी भडकावले जाते
भारतीय मुस्लिमांना बाबरी मशीदबाबतचा बदला घेण्यासाठी भडकवले जात आहे. या मासिकात बाबरी मशीदीच्या विध्वंस संबंधातील फोटो जोडलेले आहेत. यात बाबरी मशीदीचा बदला घेतला जाणार असल्याचे लिहिले आहे.

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ पूर्ण करून प्रस्ताव सादर करावेत -वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या