उदयपूर : कन्हैयालाल (५०) यांची तालिबानी पद्धतीने गळा चिरून हत्या करणा-या रियाज अत्तारीचे धागेदोरे दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) रिमोट स्लीपर सेल अलसुफाशी जोडले आहेत.
एनआयएच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, रियाज ५ वर्षांपासून अलसुफासाठी उदयपूर व आसपासच्या जिल्ह्यांत काम करत होता. आधी तो मुजीबच्या हाताखाली होता. तो अडीच महिन्यांपासून अलसुफाचे नेतृत्व करत होता. मुजीब तुरुंगात आहे.