36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयभारतात व्यापार करणे झाले जिकरीचे

भारतात व्यापार करणे झाले जिकरीचे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : व्यवसाय करण्यास पूरक वातावरण असलेल्या देशांच्या यादीत भारताने आधीच्या तुलनेत वरचे स्थान मिळवले आहे. मात्र आजही अमेरिकेन उद्योगपतींना भारतात व्यवसाय, व्यापार करणे जिकरीचे वाटते. अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र विभागाने तसा स्पष्ट उल्लेख नव्या अहवालात केला आहे. भारत व्यापार करण्यासाठी अवघड ठिकाण आहे. देशात स्थायी विकास व्हावा यासाठी अतिरिक्त आर्थिक सुधारणांची गरज आहे, असे अमेरिका सरकारने अहवालात नमूद केले आहे.

सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी भारताची जगात ओळख आहे. मात्र तरीही खासगी क्षेत्रात होणारी थेट परकीय गुंतवणूक फारशी वाढलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील पहिल्या २ वर्षांत थेट परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र गेल्या वर्षभरात विकासदर अतिशय कमी राहिला आहे. अमेरिकन सरकारचा अहवाल भारतासाठी धक्का मानला जात आहे. आधीच कोरोना संकटाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यात आता अमेरिकेने भारत फारसा उद्योगस्रेही देश नसल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीवर प्रतिकूल परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

नुकसान भरपाईसाठी आयात शुल्कात वाढ
चीनसोबतच्या व्यापाºयातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने २०१८ मध्ये आयातवरील शुल्कात वाढ केली. त्याचा उल्लेख अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने अहवालात केला आहे. भारताचा वास्तविक हेतू काहीही असो, मात्र या शुल्क वाढीने देशांतर्गत उद्योग आणि परराष्ट्रीय गुंतवणूक दोघांच्या पुरवठा साखळीला फटका बसला. भारताने नवी गुंतवणूक आणि सध्याच्या गुंतवणुकीचा विस्तार रद्द केला. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदांवर पुनर्विचार करण्याची वेळ आली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

व्यापार वादाचे अनेक खटले प्रलंबित
जागतिक बँकेच्या ईज आॅफ डुर्इंग बिझनेस अहवालानुसार भारतात एखादा व्यापार वाद सोडवण्यासाठी सरासरी चार वर्ष लागतात. हा वेळ खूप जास्त आहे. या बाबतीत भारताचे स्थान जगात तळाकडून तिसरे आहे. भारतीय न्यायालयांमध्ये कर्मचा-यांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक खटले प्रलंबित आहेत. त्यांचा निपटारा करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतात जाऊन व्यापार करणे अवघड वाटते.

अनिल देशमुख यांना धक्का; सीबीआयविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या