24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयमित्रांचे कर्ज माफ करणे पाप

मित्रांचे कर्ज माफ करणे पाप

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरंिवद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये मोफत वीज देण्याची खेली खेळली आहे. गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून गुरुवारी राज्यात आपने सरकार स्थापन केल्यास प्रत्येक कुटुंबाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सर्व जुनी बिले माफ करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांत या आश्वासनाची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.

मोफत वीज ही जादू असल्याचे सांगताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही जादू फक्त मलाच येते. असे आश्वासन कोणी देत ​​असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. जर त्यांच्या पक्षाचे सरकार आले तर दिल्ली आणि पंजाबप्रमाणे गुजरातमध्येही सरकार मोफत वीज देईल आणि २४ तास वीज दिली जाईल. तसेच ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतची सर्व जुनी प्रलंबित बिले माफ केली जातील असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत सुविधांचे वर्णन ‘रेवडी संस्कृती’ असे केले. यावर अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा प्रसाद आहे. रेवडी नाही. जनतेला मोफत सुविधा देणे हा देवाचा प्रसाद असून, आपल्या मित्रांचे कर्ज माफ करणे हे पाप असल्याचे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशात भाजपने १२५ युनिट वीज मोफत केले, पाणी मोफत केले, बसचे निम्मे भाडे आकारणार असल्याचेही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांनी २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या