28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयसुरत येथे गणपती आगमनाच्यावेळी फायर स्टंट करणे पडले महागात

सुरत येथे गणपती आगमनाच्यावेळी फायर स्टंट करणे पडले महागात

एकमत ऑनलाईन

सुरत : सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मंगळवारी देशभरात बाप्पांचे उत्साहात आगमन झाले. प्रत्येकाने बाप्प्यांचे जल्लोषात स्वागत केले. पण असं म्हणतात कधी कधी अति उत्साह बरा नसतो. हो, उत्साहाच्या भरात आपण अनेकदा मोठ्या चुका करतो. सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या देशभरात बाप्पांचे उत्साहात आगमन करण्यात आले. गणपती आगमनाच्यावेळी अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. सूरतच्या पर्वत पाटिया परिसरात अशाच एका कार्यक्रमात स्टंटबाजी करताना एक थरारक घटना घडली.

तरुण फायर स्टंट करताना त्याच्या चक्क शरीराला आग लागली. आजूबाजूचे लोक त्याला वाचवायला धावले पण त्याने वेळीच आपले शर्ट काढले आणि स्वत:ची सुटका केली. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहताच अंगावर काटा येतो. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. फायर स्टंट करताना किंवा गणपती उत्सवादरम्यान सावधगिरीने कोणतेही स्टंट करणे गरजेचे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या