24 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home राष्ट्रीय ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

केंद्रसरकारची मंजूरी ; चीनला धक्का

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार करण्यात आली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतसरकारनेही ब्रह्मपुत्रेवर सर्वात लांब पुल बांधण्याची घोषणा केली आहे. चीनकडून भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर महाकाय धरणाची घोषणा झाल्यानंतर भारतही सतर्क झाला आहे. भारताकडून सीमेवर रस्त्यांचे मजबुत जाळे विणण्यासाठी ब्रह्मपुत्रेवर सर्वात लांब पुल निर्माण करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर हा पुल भुतान, व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आदी देशांना जोडणार आहे.

चीनसमोरील चिंता वाढणार
ट्रांस आशियाई प्रकल्पाचाच हा पुल एक भाग असणार आहे. हा पुल केवळ या भागाच्या विकासासाठीच प्रेरक ठरणार नसून चीनविरोधात कारवाई सुरु झाल्यास चीनविरोधी सर्व राष्ट्रांना सामरिक हालचालींसाठीही फायद्याचा ठरणार आहे. परिणामी चीनसमोरील चिंता वाढणार आहे. भारत व जपान यांच्यातील राजकीय भागीदारीचे प्रदर्शन या प्रकल्पातून होत आहे. भारताच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओससह अनेक आशियाई देशांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तब्बल १९ किलोमीटर लांबी
भारतातील आसाम व मेघालय या दोन राज्यांना जोडणाºया या पुलाची लांबी तब्बल १९ किलोमीटर इतकी असणार आहे. इशान्य भारतातील सर्व राज्यांना याचा लाभ होणार आहे.

बिळे बुजणार कधी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या