21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयजगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती ; राष्ट्रपतींनी दिली शपथ

जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती ; राष्ट्रपतींनी दिली शपथ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. धनखड यांची ६ ऑगस्ट रोजी उपाध्यक्षपदी निवड झाली होती. विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून धनखड विजयी ठरले.

धनखड यांनी जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली. धनखड १९८९ मध्ये झुंझुनूमधून खासदार झाले. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावरच त्यांना मोठा पुरस्कार मिळाला. १९८९ ते १९९१ या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आले होते.

मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनखड यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९९३ मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. २००३ मध्ये त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. धनखड यांनी एकूण वैध मतांपैकी ७२ टक्क्यांहून अधिक मतांसह उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ंिजकली होती.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या