नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचे मंत्रीमंडळात आरोग्य मंत्री असणा-या सतेंद्र जैन यांना ईडीने मनी लॉंड्रींग प्रकरणात अटक केली आहे, यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ईडीने जैन यांना केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे, केजरीवाल यांनी ईडीची ही कारवाई पूर्णपणे खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
आप हा एक प्रामाणिक राजकीय पक्ष आहे आणि या प्रकरणात एक टक्काही तथ्य असते तर मी स्वत: जैन यांच्यावर कारवाई केली असती, असे केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले. मी जैन यांच्यावरील खटल्याचा अभ्यास केला आहे. हे पूर्णपणे खोटे आहे आणि राजकीय कारणांनी प्रेरित आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. जैन हे सत्याच्या मार्गावर आहेत आणि ते स्वच्छ बाहेर येतील असे केजरीवाल म्हणाले. सोमवारी काही तासांच्या चौकशीनंतर जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले, असे अंमलबजावणी संचालनालय अधिका-यांनी सांगितले.