26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयमनी लाँड्रिंग प्रकरणी जैन यांचा जामीन फेटाळला

मनी लाँड्रिंग प्रकरणी जैन यांचा जामीन फेटाळला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने जैन यांच्या जामिनाशी संबंधित सर्व अर्ज फेटाळले आहेत.
सत्येंद्र जैन यांच्याशिवाय अन्य दोघांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. ३० मे रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सत्येंद्र जैन यांना मनी लाँंिड्रगशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती.

तेव्हापासून ते तिहार तुरुंगात बंद आहेत. मागील सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश विकास धुळ यांच्या न्यायालयाने सांगितले होते की, अद्याप आदेश तयार झालेला नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ जून २०२२ पासून आप नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने ३० मे रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांना अटक केली होती. जैन यांनी अनेक ऑपरेटर्सना रोख रक्कम पुरवल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. तर, ईडीचे आरोप जैन यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज त्यांनी आपला निकाल जाहीर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या