सिमला : हिमाचल प्रदेशात भाजपने माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. भाजप विधीमंडळ पक्षाची रविवारी शिमल्यात बैठक झाली.
त्यात भाजपचे माजी प्रभारी मंगल पांडे यांनी जयराम ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला. आता ठाकूर पुढील ५ वर्षांपर्यंत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी राहतील. या अगोदर ते राज्याचे मुख्यमंत्री होते.