श्रीनगर : जम्मू काश्मीर सरकारने बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी संघटनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या संघटनेशी संलग्नित फलाह-ए-आम ट्रस्ट (एफएटी) द्वारे संचालित शैक्षणिक संस्था पुढील १५ दिवसांत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. या शाळेतील सर्वच विद्याथी सरकारी शाळेत प्रवेश घेतील, असेही सरकारने निर्देश दिले आहेत.
जमात ए-इस्लामी संस्थेतील विद्यार्थी कंट्टरपंथीयांमध्ये सहभागी झाले आहेत, जे पुढे जाऊन कट्टर फुटीरवादी झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश किंवा नोंदणीची आवश््यकता असणार नाही.