16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा

जम्मू काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून राज्यांना ४२ टक्के कर वाटा दिला जातो. जम्मू काश्मिर केंद्र शासित असल्याने राज्याला १ टक्का कर कमी मिळाला. मात्र केंद्र सरकार जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्ज देण्यावर विचार करीत आहे, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दिले.

राजधानी दिल्लीत आत्मनिर्भर भारताचा मार्ग हा विषय केंद्रस्थानी ठेवून आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ व्या वित्त आयोगाचा अहवाल स्वीकारल्याचे सांगत सितारमन म्हणाल्या, भाजपा राज्या राज्यांत फरक करत नाही. सर्व जनतेचा स्वत:च्या ताकदीवर आणि सरकारच्या सामर्थ्यावर विश्वास असला पाहिजे. आम्ही सहकारी संघराज्यावर चर्चा करत आहोत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या