21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयजेईई मेन परीक्षा १७ जुलैला

जेईई मेन परीक्षा १७ जुलैला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षेची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, ही परीक्षा १७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख संयुक्­त प्रवेश मंडळाने बुधवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे जेईई मेनचा निकाल १४ ऑगस्टपर्यंत जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना साथीच्या आजारामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ब-याच काळापासून या परीक्षा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू होती.
यावेळी देशभरातील १७४ केंद्रांवर घेण्यात येणा-या जेईई मेनमध्ये, ९२,६९५ विद्यार्थी उपस्थित राहतील. संयुक्­त प्रवेश मंडळाच्या म्हणण्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे समुपदेशन तीन टप्प्यात पूर्ण केले जाईल.

१५ सप्टेंबरपर्यंत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणा-या या परीक्षेच्या तारखेची विद्यार्थी खूप दिवस प्रतीक्षा करत होती. अखेर मंडळाने परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला.

यापूर्वी ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. परंतु, कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. करोनाच्या धोक्­यामुळे जेईई, एनईईटीसह अनेक प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे मंडळाने सर्व केंद्र व राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत.

मराठवाडा पाणी ग्रीडच्या कामाची पैठणपासून सुरुवात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या