24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रजेईई मेन्स 2020 चा निकाल जाहीर

जेईई मेन्स 2020 चा निकाल जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयआयटी व इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला आहे. या परीक्षेत गुजरातचा निसर्ग चढ्ढा देशात प्रथम आला असून, महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान स्वयम् शशांक चौबे याला मिळाला आहे. चौबेचा राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक आहे. तसेच या परीक्षेत १०० टक्के मिळविणाऱ्या पहिल्या चोवीस विद्यार्थ्यांत तेलंगणमधील सर्वाधिक सात विद्यार्थी आहेत.

जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर आपणास निकाल पाहता येईल.
-या संकेतस्थळावर आपणास View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करावे लागेल
-त्यानंतर आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल.
-नंतर आपला सिक्युरिटी पिन नंबर टाका.
-नंतर लॉग इन करा.
-यानंतर तुम्हाला तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

पाच दशकांत ६८ टक्के जीव-जंतू नामशेष!

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या