22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयशक्ती नव्हे येशूच खरा देव

शक्ती नव्हे येशूच खरा देव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेदरम्यान ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. राहुल गांधींच्या या यात्रेवर भाजपचे बारीक लक्ष असून वाद निर्माण होतील अशा गोष्टी सध्या भाजपच्या आयटीसेलकडून जाहीर केल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक नवा व्हीडीओ समोर आणला आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या ख्रिश्चन धर्मगुरुंसोबतच्या एका बैठकीत शक्ती नव्हे येशू हाच खरा देव आहे असे विधान एका पाद्रीने केले. यावरुन भाजपने राहुल गांधींना टार्गेट केले आहे.

राहुल गांधींच्या या व्हायरल व्हीडीओत ते पाद्रींना विचारतात की, जिजस ख्राईस्ट हे देवाचे रुप आहेत का? हे योग्य आहे का? त्यावर उत्तर देताना पाद्री पौन्नैय्या म्हणतात, होय जिजस ख्राईस्ट अर्थात येशू हाच खरा देव आहे. त्याचे रुप शक्तीसारखे (हिंदू देवी) नाही. राहुल गांधी आणि पाद्रींच्या बैठकीच्या या व्हिडिओवर भाजपनं आक्षेप घेतला असून काँग्रेसची ही भारत तोडो यात्रा आहे. यावर काँग्रेसनं प्रत्युत्तर देताना भाजपची ही आणखी एक खोडी आहे. काँग्रेसच्या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहुन भाजप हताश झाली आहे.

पाद्री पोन्नैयांना झाली होती अटक
ज्या तामिळ पाद्री पोन्नैया यांनी हे विधान केले आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अशी वादग्रस्त विधानं केली आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात पोन्नैया यांना वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटक झाली होती. मदुरैच्या कालीकुडी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, द्रमुक सरकारच्या मंत्री आणि इतरांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी अटक झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या