19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय वायुसेनेत घेणार महिला अग्निवीर भरारी

भारतीय वायुसेनेत घेणार महिला अग्निवीर भरारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय वायु सेनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. शतकाकडे वाटचाल करणा-या भारतीय वायुसेनेने शनिवारी चंदीगडमध्ये सादर केलेल्या एअर शोमधून संपूर्ण जगाने भारतीय वायुसेनेचे शौर्य अनुभवले. वायूसेना आता पुढच्या टप्प्यात लवकरच महिला अग्निविरांना वायुदलात सामावून घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वायुदल या महिलांना थेट वायुदलात सैनिक म्हणून भरती करून घेणार आहे.

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनीच हे संकेत दिले. ते म्हणाले पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांचीही वायुसेनेत भरती होणार आहे. महिलांची भरती करण्यापूर्वी आम्हाला सर्व प्राथमिक व पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील. महिला सैनिकांना कोणतीही अडचण येऊ नये, असे वातावरण तयार करावे लागेल. या वर्षी वायुसेनेकडून ३००० अग्निवीरांची भरती होणार आहे. सरकारने भारतीय वायुसेनेतील अधिका-यांसाठी वेपन सिस्टम विंग तयार करण्यास मान्यता दिली आहे. पुढील वर्षापासून महिला अग्निशमन दलाचा समावेश करण्याचा विचार आहे

प्रथमच वायुसेनेत महिला सैनिक
भारतीय वायुदलात अधिकारी पदावर महिला आहेत. परंतु एअरमन सैनिक रँकमध्ये महिलांचा अद्याप समावेश नाही. पहिल्यांदाच वायुसेनेत महिला सैनिक म्हणून रुजू होणार आहेत. पुढील वर्षी ३५०० अग्निवीरांची भरती होईल. तेव्हा ३ % महिलांसाठी राखीव असतील. यानंतर, दरवर्षी त्यात वाढ होईल. चार वर्षांत ती १० % पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

महिला अशा येतील वायुदलात
एअरफोर्समध्ये सध्या ३९ ट्रेड्स आहेत. महिला अग्निवीर यातील कोणत्याही ट्रेडचा भाग होऊ शकतात. अग्निवीर म्हणून चार वर्षे पूर्ण केल्यानंतर त्या कायमस्वरूपी वायुसेनेचा भाग बनतील. वायुसेनेत भरती होणा-या महिला अग्निवीरांना सुरुवातीला कोणताही ट्रेड दिला जाणार नाही. चार वर्षे अग्निवीर असताना त्यांना सर्व प्रकारची कामे शिकवली जातील. त्या आधारे त्यांची चाचणी होईल. वायुदलात कायमस्वरूपी होणा-या महिला अग्निविरांपैकी २५ % महिला एअरमन बनतील. त्यांना पुन्हा ट्रेड दिला जाईल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या