23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयजुलैचा जीएसटी १ लाख कोटी पेक्षा जास्त

जुलैचा जीएसटी १ लाख कोटी पेक्षा जास्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सलग आठ महिने जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींच्या पार जमा होत होता. मात्र गेल्या महिन्यात जीएसटीचे कलेक्शन १ लाख कोटींच्या खाली जमा झाले होते. मात्र या महिन्यान पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत १ लाख १६ हजार ३९३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यात राज्याची कर रक्कम २८ हजार ५४१ कोटी आणि केंद्राचा वाटा २२ हजार १९७ कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी ५७ हजार ८६४ कोटी आहे.

एकीकृत जीएसटीत २७ हजार ९०० कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर ७ हजार ७९० कोटी जमा झाला आहे. ८१५ कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे. जीएसटीची रक्कम १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान जीएसटीआर-३ बी च्या माध्यमातून जमा झाला आहे. जुलै २०२० च्या तुलनेत ३३ टक्के अधिक कर जमा झाला आहे. जुलै २०२० मध्ये जीएसटी ८७ हजार ४२२ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार १४७ कोटी, तर राज्याचा वाटा २१ हजार ४१८ कोटी होता. तर एकीकृत जीएसटी ४२ हजार ५९२ कोटी रुपये इतका होता.

दुस-या लाटेमुळे संकलनात घट
जुलै २०२१ महिन्यात जीएसटी ९२ हजार ८४९ कोटी जमा झाला होता. त्यात केंद्राचा वाटा १६ हजार ४२४ कोटी, राज्याचा वाटा २० हजार ३९७ कोटी आणि आयजीएसटी ४९ हजार ७९ कोटी इतका होता. कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाउन यामुळे जून महिन्यात जीएसटी संकलनात घट झाल्याचे समोर आले आहे. मात्र जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा जीएसटीत वाढ होताना दिसत आहे.

जुलैमध्ये सहा लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या