30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home राष्ट्रीय ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेसह 7 लोकांचा जागीच मृत्यू

ट्रकच्या धडकेत गर्भवती महिलेसह 7 लोकांचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

ट्रक उभा असताना मागून येणाऱ्या भरधाव कारनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला

बंगळुरू : उभ्या असलेल्या ट्रकला कारनं जोरदार धडक दिली आणि घात झाला.कारमध्ये असलेल्या गर्भवती महिलेसह 7 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारची धडक इतकी भीषण होती की कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

मृतांची नावे 25 वर्षीय गर्भवती महिला इरफाना बेगम, रुबिया बेगम (50), आबेडबी (50), जैचुनबी (60), मुनीर (28), मोहम्मद अली (38) आणि शौकत अली (29) अशी आहेत. या बाबत कालाबुरागी शहरातील वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील भीषण रस्ते अपघाताची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी भयंकर अपघात झाले आहेत. या अपघाताचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रक उभा असताना मागून येणाऱ्या भरधाव कारनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.हा अपघात इतका भयंकर होता की कारचा जुराडा झाला असून आतमध्ये असलेले गर्भवती महिलेसह 7 जणांचा जागीच मृत्यूदेखील झाला आहे. याआधी देखील कर्नाटकातील तुमकुरु इथे 6 मार्च रोजी भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला होता. कार डिव्हाडरला धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला होता आणि त्यावेळी अक्षरश: मृतदेह कार कापून काढावे लागले होते.

सर्पदंश झालेल्या कर्मचाऱ्याचा मुख्याधिकाऱ्यांनी उचलला खर्च; दैनिक एकमतच्या बातमीचा दणका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या