नवी दिल्ली : शेतकरी संघटना कृषि कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. मात्र सरकारकडून वारंवार चर्चेचा घोळ सुरु आहे. जवळपास दोन महिने झाले आहेत, आम्ही थंडी वातावरणाने त्रस्त आहोत व मरत आहोत. मात्र सरकार केवळ तारीख पे तारीख करत आहे. शेतकरी कंटाळून निघून जावेत म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत. हे सरकारचे षडयंत्रच आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषि कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनप्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीवरही शेतक-यांनी अविश्वास दाखवला आहे. काही झाले तरी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचे शेतकरी नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलनाशी संबंधित नेत्याला समन्स