26.4 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय भाजपाच्या जाहीरनाम्यातून ज्योतिरादित्य गायब

भाजपाच्या जाहीरनाम्यातून ज्योतिरादित्य गायब

एकमत ऑनलाईन

भोपाळ: मध्य प्रदेशातील २८ जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या केवळ ५ दिवस आधी भाजपने आपला जाहिरनामा जाहीर प्रसिद्ध केला. अलिकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र जाहीरनाम्यात स्थान देण्यात आलेले नाही. त्यांचा साधा फोटोही जाहिरनाम्यात नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जाहिरनामा प्रसिद्ध होण्याच्या ५ दिवस आधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात फक्त गरीबांनाच मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली होती. नंतर त्यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लस मोफत दिली जाईल, असे ट्विट केले होते. पण नंतर काही काळानंतर त्यांनी हे ट्विट हटवले होते. मुख्यमंत्र्यांचे ट्विट आणि नंतर ते हटवल्याने कोरोना लसीबाबत राज्यात संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करत पक्षाने आपल्या जाहिरनाम्यातून संपूर्ण जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान भाजपाच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसकडून टीका केली जात आहे. कोरोनावर अजून लसही आलेली नसताना मोफत लस देण्याचे आश्वासन देऊन भाजप कोरोनासारख्या आजाराचाही राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

७ महिन्यात १७ घोटाळे
काँग्रेसने शिवराजसिंह सरकारवर ७ महिन्यात १७ घोटाळे केल्याचा आरोप केला आहे. पीठ चोरी घोटाळा, त्रिकूट चूर्ण घोटाळा, दारू एमआरपी घोटाळा, उद्योग बदली घोटाळा, सरकारी खरेदी घोटाळा, बनावट वीज बिल घोटाळा, पीपीई किट घोटाळा, माध्यान्ह भोजन घोटाळा, पंतप्रधान सन्मान निधी घोटाळा, सौभाग्य योजना, तांदूळ घोटाळा आदी १७ घोटाळ्यांसह जुन्या घोटाळ्यांचा उल्लेख देखील काँग्रेसने केला आहे. यात डंपर घोटाळा, व्यापमं घोटाळा, होशंगाबाद वाळू घोटाळ्याचाही समावेश आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या