22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयज्योतिरादित्य शिंदे आणणार आफ्रिकन चित्ते

ज्योतिरादित्य शिंदे आणणार आफ्रिकन चित्ते

एकमत ऑनलाईन

भोपाळ : इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. ग्वाल्हेर संस्थानचे तत्कालीन प्रमुख असलेल्या माधवराव शिंदे यांनी घडवलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती ज्योतिरादित्य करणार आहेत.

सन १९०४ मध्ये जुनागढ संस्थान होते. तिथल्या नवाबाकडून माधवरावांनी गिरचे आशियाई सिंह मागितले होते. मात्र नवाबाने सिंह देण्यास नकार दिला. त्यानंतर माधवरावांनी दक्षिण आफ्रिकेतून सिंह आणले. पुढे हे सिंह कुनो खो-यात राहू लागले. त्यांच्यासाठी त्यावेळी २०-२० फूट उंच पिंजरे तयार करण्यात आले होते. आता माधवरावांच्या चौथ्या पिढीतले वंशज असलेले ज्योतिरादित्य शिंदे आफ्रिकन चित्ते भारतात आणणार आहेत. त्यासाठी त्यांनी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चादेखील केली आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाची स्थापना गुजरातच्या गिरमधील सिंहांना आणण्याच्या उद्देशाने झाली. तब्बल २६ वर्षांपूर्वी या प्रकल्पावर काम सुरू झाले. ५ हजाराहून अधिक आदिवासींना त्यांची जमीन सोडावी लागली. त्यांच्या हातून रोजगार गेला. मात्र २६ वर्षांनंतरही कुनोमध्ये आशियाई सिंह आले नाहीत.

माधवरावांना जुनागढच्या नवाबाने आशियाई सिंह दिले नव्हते. आता मध्य प्रदेश सरकारला गुजरात सरकारने सिंह दिले नाहीत. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. न्यायालयाने गुजरात सरकारची कानउघाडणी केली. मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने निर्णय दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या