21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयकंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद

कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे आता एक समीकरणच बनले आहे.आताही अशाच एका घटनेवरून कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगनाने काही वादग्रस्त ट्वीट केले होते. त्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने कंगनावर कारवाई कराताना तिचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे.

देशातील संपूर्ण राजकीय विश्­वाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्­चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसने एक हाती वर्चस्व राखले आहे. मात्र बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या बाबत कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केले, यामुळे कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठवाड्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या