24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयकन्हैया कुमार, मेवाणी यांचा २८ सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रवेश?

कन्हैया कुमार, मेवाणी यांचा २८ सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रवेश?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होईल, अशी माहिती एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती.

कन्हैया कुमारने काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे कन्हैया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. पण जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अचानक घेतल्याचे यामुळे दिसून आले आहे. २०१९ साली कन्हैया कुमारने बिहारमधील बेगुसराय मतदार संघातून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला कन्हैया कुमारने सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. कन्हैय्या या कार्यक्रमात बोलला आणि चर्चेत देखील सहभाग घेतला होता, अशी माहिती सीपीआय नेते डी. राजा यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या