लखनौ : ३ जून २०२२ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत एसआयटीने मंगळवारी कोर्टात केस डायरी दाखल केली. त्यावर कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक खुलासे झाले असून त्यात दगडफेकीपासून ते बॉम्बस्फोटापर्यंतचे दर दंगलीच्या सुत्रधारांकडून ठरवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील केस डायरी सरकारी वकील दिनेश अग्रवाल यांनी दाखल केली होती. कानपूरमधील हिंसाचार सुनियोजित होता, यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी वित्तापासून (पैसे) वेगळी जबाबदारी निश्चित करण्यात आली होती.
बिल्डर हाजी वासी आणि हयात जफर हाश्मी यांनी हिंसाचाराच्या निधीसाठी मालमत्ता विकून १ कोटी ३० लाख रुपये गोळा केल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले. हाजी वासीने हिंसाचाराच्या एक दिवस आधी ३४ लाख रुपयांच्या दोन मालमत्ता विकल्याचे एसआयटीला समजले आहे.
हाजी वाशीचा मॅनेजर अफजलने हिंसाचार भडकवण्यासाठी संपूर्ण टीम तयार केली होती आणि दंगलखोरांना १० लाख रुपये अॅडव्हान्स दिले होते.