नवी दिल्ली : महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व बिहारमध्ये मान्सूनचा ट्रेलर दिसून येत आहे. मुंबईत मंगळवारी पहाटे काही भागांत हलक्या रिमझिम पावसाची नोंद झाली, तर राजधानी दिल्लीत सलग दुस-या दिवशी धुळीच्या वादळासह पाऊस झाला. दुसरीकडे केदारनाथमध्ये मुसळधार पाऊस व हिमवर्षावामुळे सोनप्रयागमधील केदारनाथ यात्रा रोखण्यात आली. रुद्रप्रयाग सर्कल ऑफिसर प्रमोद घिल्डियाल यांनी फाटा व गौरीकुंड येथील हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित केली. हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार मुंबईतील काही भागांत रिमझिम पाऊस झाला. यामुळे रात्रीच्या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.