28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयप्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून; ४ राज्यांतील कोरोना स्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा

प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून; ४ राज्यांतील कोरोना स्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोरोनास्थितीचा आढावा घेत आहेत. कोरोना संदर्भातील उपाययोजना आणि समस्या जाणून घेत आहेत. कोरोना स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत असून, प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची खात्रीही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली़

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मणिपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला होता. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब, कर्नाटक, बिहार आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली.

गेल्या २४ तासात कर्नाटकात ४७,५६३, बिहारमध्ये १२,९४८, पंजाबमध्ये ९,०४२ आणि उत्तराखंडमध्ये ८,३९० रुग्णांची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. देशात कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे बिकट स्थिती आहे. अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. अपु-या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांचे हाल होत असून आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहे.

राज्यात विक्रमी रुग्णांनी केली कोरोनावर मात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या