24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवाल नजरकैदेत? - पोलिसांनी दावा फेटाळला

केजरीवाल नजरकैदेत? – पोलिसांनी दावा फेटाळला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजर कैद केल्याचा आपचा आरोप दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. दिल्लीच्या उत्तर जिल्हा पोलिस उपायुक्तांनी मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवास स्थानाबाहेरील फोटो ट्विट करुन नजरकैद केल्याचा दावा फोल ठरवला आहे.

आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा दावा केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंघूू सीमेवर जाऊन शेतक-यांना भेटून आल्यानंतर भाजपच्या पोलिसांनी केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले आहे. कुणालाही त्यांच्या घरात जाण्याची किंवा बाहेर येण्याची परवानगी नाही, असे ट्विट आपने केले आहे.

पोलिसांनी केले फूटेज जारी
आपच्या या ट्विटवर दिल्ली पोलिस उपायुक्तांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी नजरकैद केल्याचा दावा खोटा आहे. कायद्यानुसार त्यांना मिळालेल्या सर्व अधिकारांचा ते कोणत्याही अडथळ्याविना वापर करत आहेत. त्यांच्या घराबाहेरील परिस्थितीचे हे चित्र सारेकाही सांगून जाते, असे ट्विट दिल्ली पोलिस उपायुक्तांनी केले आहे.

नव्या कृषी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचा आज भारत बंद

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या