23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातच्या शेतकऱ्यांना केजरीवालकडून कर्जमाफीचे आश्वासन

गुजरातच्या शेतकऱ्यांना केजरीवालकडून कर्जमाफीचे आश्वासन

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातमध्ये यावर्षी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी राजकीय भेटीगाठी सुरू आहेत. यासोबतच नेत्यांचे दौरेही सुरू आहेत. आम आदमी पक्षाचे नेते नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील द्वारका शहरात एका सभेला संबोधित केले. या मेळाव्याला संबोधित करताना केजरीवाल यांनी मोठमोठी आश्वसने दिली.

केजरीवाल म्हणाले की, निवडणुका आल्या आहेत. हे भाजपचे लोक मला शिव्या देतील, गोपाळला देतील, इशुदांना देतील, पण शिव्या देऊन काय होणार? देशाची प्रगती होणार नाही. आम्ही देशाला नंबर १ करण्यासाठी आलो आहोत.

केजरीवाल पुढं म्हणाले की, मी राजकारण करण्यासाठी आलो नाही. देशाला नंबर-१ बनवायचं आहे. मी कामाची हमी देत ​​आहे. मी आश्वासन पूर्ण केले नाही, तर पुढच्या वेळी मतदान करू नका. प्रत्येक तरुणाची व्यवस्था करू आणि १० लाख सरकारी नोकऱ्या तयार करू. मात्र जोपर्यंत नोकरी देणार नाही, तोपर्यंत ३ हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल.

जाहीर सभेत मोफत वीज देण्याची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले, दिल्लीत लोकांना २४ तास वीज मिळते, तीही मोफत. ही जादू फक्त केजरीवालांनाच येते. इतर कोणालाच माहीत नाही. गुजरातमध्ये सरकार बनवा, ३ महिन्यांनंतर तुमचे वीजबिल शून्यावर येईल. तसेच आम्ही सर्व जुनी बिले माफ करू आणि ३०० युनिट मोफत देऊ.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या