24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवाल सत्तापिपासू

केजरीवाल सत्तापिपासू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल हे सत्तापिपासू आहेत. दोन राज्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे ते स्वत:ला देव समजू लागले आहेत, अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उलटवार केला. ते म्हणाले की, केजरीवाल भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण करीत आहेत. प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा याविषयी न्याययंत्रणेपेक्षा केजरीवाल यांचे प्रमाणपत्र महत्त्वाचे असावे असे दिसते.

आपला पक्ष कट्टर इमानदार असल्याचा दावा ते करीत असले तरी प्रत्यक्षात तो कट्टर बेईमान आणि भ्रष्ट आहे. त्यांची भाषा पाहता त्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याचे दिसते. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्ष नावालाही उरला नाही. इतिहासात सर्वात कमी कालावधीत एखाद्या सरकारच्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली राजीनामे द्यावे लागत असतील तर ते केजरीवाल सरकार आहे. सर्वांनी तीन चार महिन्यांसाठी तुरुंगात जावे असे ते सांगत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या