29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय लव जिहादकडे केरळ सरकारचे दुर्लक्ष

लव जिहादकडे केरळ सरकारचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

कासारगोड : केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हळूहळू सर्वपक्षीयांची आपापल्या पद्धतीने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ केरळमधील कासारगोड येथे एका रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी कोरोना संकट तसेच लव जिहादवरून योगी आदित्यनाथ यांनी केरळ सरकारवर टीका केली.

केरळमधील भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी विजय यात्रेचे उद्घाटन योगी आदित्यनाथ यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी केरळ सरकार आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीकास्त्र सोडले. सन २००९ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने लव जिहादसंदर्भात टिप्पणी केली होती. मात्र, लव जिहाद रोखण्यासाठी केरळ सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. लव जिहादमुळे केरळ इस्लामिक राज्य होईल, असे केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी नमूद केले होते, असा दावा करत केरळ सरकारने त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

शबनमची फाशी थांबवा – महंत परमहंस दास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या