27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयकेरळकडे आता स्वत:चे इंटरनेट; देशातील पहिले आणि एकमेव राज्य

केरळकडे आता स्वत:चे इंटरनेट; देशातील पहिले आणि एकमेव राज्य

एकमत ऑनलाईन

केरळकडे आता स्वत:चे इंटरनेट; देशातील पहिले आणि एकमेव राज्य
तिरूअनंतपुरम : इंटरनेटने जग जवळ आले. तसेच प्रत्येक कानाकोप-यात पोहोचले आहे. दरम्यान, स्वत:ची इंटरनेट सेवा असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी गुरूवारी यासंदर्भात माहिती दिली. या सेवेतर्फे राज्य सरकार २० लाख कुटुंबांना मोफत वाय-फाय देणार आहे.

केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड, दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदाता परवाना मिळाल्यानंतर राज्यातील सर्वांसाठी इंटरनेट सुलभ करण्यासाठी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी आयटी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती खुद्द केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्विट करुन दिली आहे.

केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड ही सरकारची महत्त्वाकांक्षी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर योजना आहे, जी राज्यातील प्रत्येकाला इंटरनेटचा वापर करता येईल. परवाना मिळाल्यानंतर समाजातील डिजीटल दुरावस्था दूर करण्यासाठी संकल्पित प्रकल्पाचे काम सुरु करता येईल, असे विजयन यांनी ट्विटरवर सांगितले.

विशेष म्हणजे केरळ सरकारने १,५४८ कोटी रुपयांची फायबर ऑप्टिक नेटवर्क योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत सुमारे २० लाख गरीब कुटुंबांना मोफत हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन दिले जाईल. याशिवाय राज्यातील ३० हजारांहून अधिक सरकारी कार्यालये आणि शाळाही या योजनेशी जोडल्या जाणार आहेत. तसेच, इंटरनेट योजनेमुळे वाहतूक, व्यवस्थापन आणि आयटी क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या