24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयगुजरातमधील केवडीया देशातील प्रथम इलेक्ट्रिक वाहन शहर होणार

गुजरातमधील केवडीया देशातील प्रथम इलेक्ट्रिक वाहन शहर होणार

एकमत ऑनलाईन

दिल्ली : पर्यावरण दिना निमित्तानेएका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या पहिल्या इलेक्­ट्रॉनिक शहराबद्दल उल्लेख केला. यामध्ये त्यांनी सांगितले की, स्टॅच्यू ऑफ यूनिटी असलेले शहर हेच भारतातील पहिले इलेक्­ट्रॉनिक शहर असणार आहे. पीएम मोदी या कार्यक्रमात भविष्यातील योजनेबद्दल सांगत म्हणाले की, आगामी काळात पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन गुजरातमधील केवडिया शहरामध्ये फक्त बॅटरीवर चालणा-या वाहनांनाच प्राधान्य दिले जाईल. आगामी काळात या शहरात फक्त बॅटरीवर चालणारी कार आणि बस धावतील.

पीएम मोदींच्या या घोषणेपूर्वी, सन २०१९ मध्ये केंद्र सरकारने केवडियामध्ये केवळ इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. नॅशनल टुरिझम ऍडव्हायझरी कॉन्सिलचे माजी अध्यक्ष आणि माजी पर्यटनमंत्री केजे एल्­फॉन्­स यांनी सांगितले होते की, आता स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी जागतिक स्तरावरील पर्यटनाची सुविधा विकसित करणे हे प्राथमिक ध्येय असणार आहे.

एल्­फॉन्­सने केवडिया यांनी त्यावेळी देशातील पहिला इलेक्ट्रिक वाहन पर्यटन उपक्रम देखील सुरू केला. स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पर्यावरण पूरक ई-बाईकचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी माजी पर्यटनमंत्री म्हणाले होते की, ई-बाईकच्या सहाय्याने येथे पर्यटनाला चालना दिली जाईल. एल्­फॉन्­सच्या म्हणण्यानुसार ई-बाईकच्या मदतीने पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटचे सौंदर्य टिकवून ठेवणे आणि इकडचा इतिहास समजण्यास मदत होईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण लागू करा -उदयनराजे भोसले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या