24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीय‘घर घर राशन’ योजनेवरून खडाजंगी

‘घर घर राशन’ योजनेवरून खडाजंगी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावरून आता भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाल्याचे दिसत आहे. योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारपरिषद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावर आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिले गेले आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांच्या आरोपांचे खंडण करत, दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

केजरीवाल यांनी आज म्हणणे मांडताना सांगितले की, पंतप्रधान मोदी दिल्लीच्या गरीब जनतेला त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवत आहेत आणि ‘घर घर राशन’ ला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर असे अजिबात नाही. पंतप्रधान मोदी नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्ट आणि पीएम गरीब कल्याण योजनेद्वारे दिल्लीच्या गरजूंना रेशन पोहचवत आहेत, असे भाजपा प्रवक्त संबित पात्रा म्हणाले आहेत. तसेच, मोदी सरकारने दिल्लीला आतापर्यंत नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टअंतर्गत ३७ हजार ४०० मेट्रीक टन धान्य पाठवले आणि पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५ जूनपर्यंत ७२ हजार ७८२ मेट्रीक टन धान्य पाठवले आहे. मात्र दिल्ली ५३ हजार मेट्रीक टन धान्यच उचलू शकली आहे आणि यातील केवळ ६८ टक्केच त्यांच्याकडून जनतेला वाटप झाले आहे. असेदेखील संबित पात्रा यांनी सांगितले आहे.

पिझ्झाची डिलिव्हरी होऊ शकते मग रेशनची का नाही?
तर, पत्रकारपरिषदेत पंतप्रधान मोदींवर थेट टीक करताना जर या देशात पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी होऊ शकते, स्मार्ट फोन व कपड्यांची होम डिलिव्हरी होऊ शकते. तर मग गरिबांच्या घरी रेशनची होम डिलिव्हरी का नाही होऊ शकत? संपूर्ण देश जाणू इच्छित आहे की तुम्ही ही योजना रद्द का केली? असा प्रश्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना विचारला होता.

नांदेड जिल्ह्यात वादळी पावसाची जोरदार हजेरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या