चंदीगढ : हरियाणाचे गोरक्षा प्रमुख मोहित यादव उर्फ मोनू मानेसर याला अटक करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी मंगळवारी हरियाणातील मानेसर गावात छापा टाकला. हा प्रकार कळताच मोनूचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे वातावरण तापले.
राजस्थानच्या जुनैद-नासिर हत्याकांडात राजस्थान पोलिस मोनूचा शोध घेत आहेत.दुसरीकडे मोनू मानेसरच्या समर्थनार्थ हरियाणातील मानेसरमध्ये हिंदू महापंचायत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे तणाव वाढला होता.