23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयअपात्र शेतक-यांच्या खात्यातून वसूल करणार किसान योजनेचे पैसे

अपात्र शेतक-यांच्या खात्यातून वसूल करणार किसान योजनेचे पैसे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील शेतक-यांच्या खात्यावर ६,००० रुपये पाठवले जातात. पण, अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. यामुळे आता केंद्र सरकारने कारवाई सुरू केली असून, पीएम-किसान योजनेंतर्गत ४२ लाखांपेक्षा जास्त अपात्र शेतक-यांच्या खात्यावर गेलेले ३,००० कोटी रुपये सरकार वसूल करणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने मंगळवार दि़ २० जुलै रोजी संसदेत देण्यात आली.

पीएम-किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार देशभरातील शेतक-यांना दरवर्षी तीन वेळा २-२ हजार, असे एकूण ६,००० रुपये देतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची पुर्तता व्याहला हवी. पण, काही अपात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांच्यामुळे इतर लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यास अडचणी येत आहेत. आता केंद्र सरकार या अपात्र शेतक-यांकडून हे पैसे वसूल करणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत दिली.

कोणत्या राज्यात किती शेतकरी
या योजनेचा फायदा घेणा-या आपात्र शेतक-यांची सर्वाधिक संख्या आसाममध्ये आहे. आसाममध्ये ८.३५ लाख अपात्र शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. आसामनंतर, तामिळनाडुत ७.२२ लाख, पंजाबमध्ये ५.६२ लाख, महाराष्ट्रात ४.४५ लाख, उत्तर प्रदेशात २.६५ लाख आणि गुजरातमध्ये २.३६ लाख शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत.

१५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ला?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या