18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाकेएल राहुल भारताचा कर्णधार?

केएल राहुल भारताचा कर्णधार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : विराट कोहली याने विश्वचषकानंतर टी २०चं कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुढचा कर्णधार कोण याबाबत क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. तर टी २० संघासाठी रोहित शर्मा हा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भारताच्या भावी कर्णधाराबाबत भविष्यवाणी केली आहे. भारतीय फलंदाज केएल राहुल याच्यात कर्णधारपदाचे सर्व गुण असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला त्यासाठी तयार करणं गरजेचे असल्याचे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

‘ही चांगली बाब आहे की, बीसीसीआय संघाच्या भविष्याचा विचार करत आहे. त्यापुढे विचार करणं गरजेचं आहे. जर नविन कर्णधाराचा विचार केल्या केएल राहुलकडे पाहिले जाऊ शकते. त्याने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये त्याने आपल्या फलंदाजीतून दाखवून दिले आहे. आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यात त्याची कामगिरी चांगली आहे. त्याला उपकर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे.’, असे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सांगितले.आयपीएलमध्ये राहुल पंजाब किंग्सचे नेतृत्व करत आहे. त्याने आयपीएलमध्ये खूप चांगले नेतृत्व गुण दाखवले आहेत. कर्णधारपदाचं कोणतंही दडपण त्याच्यावर दिसले नाही. त्याच्या नावाचा होणे गरजेचे आहे.’, असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

केएल राहुल २९ वर्षांचा आहे. केएल राहुल आतापर्यंत ४० कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने ६ शतकं आणि १२ अर्धशतके झळकावली आहे. कसोटीत त्याने एकूण २,३२१ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याचा १९९ ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. त्याचबरोबर केएल राहुल ३८ एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याने ५ शतके आणि ९ अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने १,५०९ धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये ८८ सामने
केएल राहुल ४८ टी २० सामने खेळला आहे. त्यात त्याला ४५ डावात फलंदाजीची संधी मिळाली आहे. यात त्याने २ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली आहेत. यात त्याने १,५५७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये ८८ सामने खेळला असून ७९ डावात खेळण्याची संधी मिळाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या