30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयकोलकाता महिलांसाठी सर्वात सुरक्षित

कोलकाता महिलांसाठी सर्वात सुरक्षित

पोलिस कार्यक्षम : नागरिकांमध्येही मदतीची भावना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात गेल्या काही वर्षात सातत्याने महिलांविरोधात अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यंदाही हाथरस, बलरामपूर अशा विविध बलात्काराच्या घटना घडल्यानंतर देशातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यापार्श्वभुमीवर एनसीआरबीचा (राष्टÑीय गुन्हे नोंद विभाग) एक अहवाल समोर आला असून त्यात देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ही बिरुदावली कोलकाता या शहराला मिळाली आहे.

‘एनसीआरबी’ने भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित अशा १९ शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे.अहवालानूसार कोलकात्यात वर्ष २०१९ मध्ये लैंगिक अत्याचाराच्या फक्त १४ गुन्ह्यांची नोंद झाली तर लैंगिक छळाच्या एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही, असे दिसून येत आहे. तसेच लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सर्वच पीडिता या १८ वर्षांपुढील असून त्यावरुन एकाही अल्पवयीन मुलीवर अत्याचार कोलकात्यात घडला नसल्याचे दिसून येत आहे. कोलकात्यातील पोलिसांच्या उत्कृष्ट कामाची ही उपलब्धी असून स्थानिक नागरिकांकडूनही अशा घटनात पीडितांच्या मदतीला धावण्याची प्रवृत्ती भरपूर असल्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यादीमध्ये कोइंबतूर दुस-या स्थानी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या बिहार पोलिस व लोकांच्या नावाने देशभर चेष्टा केली जाते,त्या बिहारची राजधानी पाटणा ही लैंगिक अत्याचाराच्याबाबतीत तिसºया क्रमांकावर आहे पाटण्यात लैंगिक छळाच्या १२ गुन्ह्यांची नोंद झाली तर कोर्इंबतूरला एकही गुन्हा नोंद झाला नाही.

गतवर्षी झालेल्या बलात्कारांच्या एकुण घटनांची संख्या ३२ हजार ३३ इतकी असून त्यातील ११ टक्के बलात्कार हे दलित महिलांवर झाले आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये उत्तरप्रदेश सर्वात पुढे असून त्यानंतर राजस्थान व महाराष्टÑाचा क्रमांक लागतो. उत्तरप्रदेशमध्ये ५९८५२ तर राजस्थानात ४१५५०, महाराष्टÑात ३७१४४ महिला अत्याचारांच्या घटना घडल्या, असेही अहवालातून समोर आले आहे.

दिल्ली, मुंबई खूप धोकादायक
शहरी पातळीवर विचार करावयाचा झाल्यास दिल्लीत २०१९ मध्ये १२३१ तर मुंबईत ३९४ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. महिलांच्या असुरक्षिततेबाबत दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून मुंबई तिसºया स्थानी आहे.

दर १६ मिनिटाला बलात्कार
– भारतात वर्ष २०१९ मध्ये दर १६ मिनिटांनंतर एका महिलेवर बलात्कार
– एकुण ४ लाख ५८६१ महिला अत्याचाराच्या घटना
– २०१८ पेक्षा ही संख्या ७.३ टक्क्यांनी अधिक
– भारतात दररोज ८८ बलात्कार

शहरानूसार क्रमवारी
शहर// घटना
दिल्ली//१२३१
जयपूर//५१७
मुंबई//३९४
हैद्राबाद // १८४
इंदोर// १५०

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या