22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home राष्ट्रीय कोविड रुग्णालयाला आग; ५ ठार

कोविड रुग्णालयाला आग; ५ ठार

एकमत ऑनलाईन

राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात गुरुवारी एका कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीत पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाच्या आयसीयू कक्षामध्ये आग भडकली. या कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील प्रत्येक राज्यांमध्ये कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत.

कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालये कार्यरत असून, गुजरातमधील राजकोटमधील शिवानंद रुग्णालय कोविड रुग्णालये म्हणून सुरू आहे. या रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. रुग्णालयातील आयसीयू कक्षात सर्वात आधी आगीचा भडका उडाला. आग लागली त्यावेळी आयसीयू कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. यापैकी पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळाने आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत अनेक रुग्ण होरपळे आहेत. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना दुसºया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवानंद रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांनाही दुसºया रुग्णालयात हलवण्यात आले आहे़

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या