23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयलेकूरवाळ्या महिलेने वाचवला बुडणा-या तरुणाचा जीव

लेकूरवाळ्या महिलेने वाचवला बुडणा-या तरुणाचा जीव

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमधील नझिराबाद पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी संध्याकाळी कामावरून घरी परतणारे दोन तरुण ओव्हरफ्लो ओढ्याच्या पाण्यात वाहून जात होते. हे दृश्य पाहून शेजारी राहणा-या एका महिलेने आपल्या काखेतील १० महिन्याच्या बाळाला खाली उतरवून स्वत: ओढ्यात उडी घेतली आणि आपला जीव धोक्यात घालून बुडणा-या तरुणाला वाचवले.

महिलेने दुस-या तरुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवता आले नाही. शुक्रवारी सकाळी दुस-या तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाचे पीएम करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांनी महिलेला रोख बक्षीस दिले आहे. महिलेने आपल्या कर्तृत्वातून नारीशक्ती काय असते हे दाखवून दिले. महिला अशा समाजाची आहे. ज्या समाजावर नेहमीच गुन्हेगारी कृत्याचे आरोप केला जातात. मात्र या महिलेने स्वत:ची आणि दहा महिन्यांच्या बाळाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून बुडणा-या दोन तरुणांपैकी एकाला वाचवले. त्यानंतर पोलिसांना फोन करूनही माहिती दिली. तरुणाचे प्राण वाचवणा-या महिलेला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या