23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयलालू प्रसाद यादव पायऱ्यांवरून पडल्याने खांदा फ्रॅक्चर

लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरून पडल्याने खांदा फ्रॅक्चर

एकमत ऑनलाईन

बिहार : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव हे पायऱ्यांवरून पडले. त्याच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर घाईघाईत लालू प्रसाद यादव यांचा आज एका खासगी रुग्णालयात एमआरआय करण्यात आला. त्यांच्या खांद्याच्या हाडात हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना दोन महिने बेड रेस्ट सांगितल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

लालू प्रसाद यादव सध्या पाटणा येथील राबडी देवीचे अधिकृत निवासस्थान १० सर्कुलर रोड येथे राहतात. यातच त्यांच्या खांद्यावर व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पायऱ्या उतरत असताना लालू प्रसाद यादव यांचा तोल गेला आणि ते पडले, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या हाताला आणि खांद्यासोबतच कमरेलाही दुखापत झाली आहे.

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खराब राहते. रांची तुरुंगात असताना त्यांना अनेक वेळा रिम्स मधून दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात आले. चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव जामिनावर बाहेर आले आहे. डोरंडा ट्रेझरीशी संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय ६० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या